आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Wrestler Coach At Austrolia, Kuldeep Bacci

भारतीय मल्लाचा ऑस्ट्रेलियात आखाडा! ऑलिम्पिकमध्ये करणार प्रतिनिधित्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- मूळ भारतीय असलेल्या कुलदीप बस्सी या अव्वल मल्लाच्या मार्गदर्शनाखाली सध्या ऑस्ट्रेलियात कुस्तीचा आखाडा रंगत आहे. मागील दोन दशकापासून ऑस्ट्रेलियातील युवकांचा कुस्तीकडचा कल वाढत आहे. यामुळे बस्सीच्या आखाड्यातील मल्लांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते.
गेल्या शतकापासून ते आपल्या कुटुंबीयांसोबत ऑस्ट्रेलियात राहतात. येथील वातावरणाशी एकरूप झाल्यानंतरही कुलदीप यांनी भारतीय संस्कृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुस्तीचा वसा सोडला नाही.
लहानपणापासून त्याची कुस्ती या खेळाशी नाळ जुळली होती. शिक्षणासह त्याने कुस्तीचा छंद जोपासून यामध्ये करिअर घडवले.
15 व्या वर्षी आखाड्यात- कुस्तीबद्दल आवड असलेल्या कुलदीपने वयाच्या 15 व्या वर्षी आखाड्यात प्रवेश केला. कुस्तीला भारतीय संस्कृतीमध्ये असलेले महत्त्व जाणून त्याने याकडे वळण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्याला अवघ्या दोन वर्षात कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवता आले. व्हिक्टोरिया येथील परिसरात तो आपल्या कुटुंबीयांसह राहतो. मात्र, फावल्या वेळेत तो कुस्तीच्या सरावाकडे लक्ष द्यायचा.
16 वर्षांपासून सुरू आहे कुस्तीचा क्लब- मातीच्या कुस्तीमध्ये तरबेज असलेल्या कुलदीपने व्हिक्टोरिया परिसरामध्ये स्वत:चा आखाडा सुरू केला. गेल्या 16 वर्षांपासून हा आखाडा अखंडपणे सुरू आहे. त्याने या आखाड्याला कुस्ती क्लब असे नाव दिले आहे. या परिसरातील अनेक युवक मोठय़ा संख्येत तालमीत सहभागी होतात. गेल्या दशकापासून युवकांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या क्लबला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
अस्सल भारतीय मल्ल असलेल्या कुलदीपच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुस्तीपटू घडले आहेत. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ष्ट्रीय, राष्टकुल स्पर्धेतील मल्लांचा सहभाग आहे. गेल्या आठ वर्षांपासून त्याच्या काही मल्लांनी ऑलिम्पिकमध्येही थेट प्रवेश केला होता. मात्र, त्यांना अपेक्षित यशापर्यंतचा प्रवास गाठता आला नाही. कुलदीपने 1988 मध्ये ऑलिम्पिक प्रवेशाची पात्रता पूर्ण केली होती. मात्र, त्याला ऐन वेळेवर कौटुंबिक कारणामुळे यातून माघार घ्यावी लागली.