आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय युवा क्रिकेट संघाचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - दीपक हुडाच्या (नाबाद 83) स्फोटक फलंदाजीनंतर कुलदीप यादवच्या (34 धावांत 4 विकेट) शानदार गोलंदाजीच्या बळावर भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने चौरंगी क्रिकेट वनडे मालिकेतील पहिल्या लढतीत शानदार विजय मिळवला. भारताने एकतर्फी लढतीत झिम्बाब्वेला 148 धावांनी नमवले.


भारतीय संघाने 50 षटकांत 6 बाद 219 धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. यानंतर भारतीय युवा गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 41.2 षटकांत 143 धावांत ढेर केले. या विजयानंतर भारताला 4 गुण मिळाले. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर हिरवाडकर 8 आणि कर्णधार विजय झोल 17 धावा काढून बाद झाले. भारताकडून हुडाने 55 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा काढल्या. सरफराज खानने 55 आणि अंकुश बैन्सने 49 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून
किरोन गेलने 32 धावांत 3 विकेट घेतल्या. ल्यूक जोंगवेने 59 धावांत 2 आणि डेवन बेलने 42 धावांत एक गडी बाद केला.
झिम्बाब्वेकडून रेयान बेर्लने सर्वाधिक 46 धावा काढल्या. उर्वरित फलंदाजांनी निराश केले. डिलान नेलने 22 आणि गेलने 18 धावा काढल्या. संघाच्या सहा फलंदाजांना दोनअंकी धावसंख्याही गाठता आली नाही. भारताकडून डावखुरा गोलंदाज कुलदीप यादवने 34 धावांत 4 विकेट घेतल्या. दीपक हुडाने 37 धावांत 2 विकेट आणि आमिर गनीने 37 धावांत दोघांना बाद केले. सरफराज खानने 9 धावांत दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त स्कोअर
भारत 19 संघ : 50 षटकांत 6 बाद 291. (बैन्स 49, सरफराज खान 55, दीपक हुड्डा नाबाद 83, 3/32 गेल, 2/59 जोंगवे)
झिम्बाब्वे 19 संघ : 41.3 षटकांत सर्वबाद 143. (बेर्ल 46, नेल 22, 4/34 कुलदीप यादव.)
द. आफ्रिका विजयी
स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेने 18 धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका 19 संघ : 179 (ब्रेडली डायल 48, एंडिले फेहलुकावायो 39*, 3/25 मॅथ्यू फोतिया), ऑस्ट्रेलिया 19 संघ : 162. (जेक जोरान 35, यासीन बली आणि ब्रेडली डायल यांना प्रत्येकी 3 विकेट).