आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indiana Masters Tennis Competition News In Marathi, Flevia Penetta

इंडियाना मास्टर्स टेनिस स्पर्धेत फ्लेविया पेनेट्टाला विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियाना वेल्स - इटलीची फ्लेविया पेनेट्टाने इंडियाना मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. तिने अंतिम सामन्यात धक्कादायक विजयाची नोंद केली. इटलीच्या 32 वर्षीय पेनेट्टाने जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असलेल्या पोलंडच्या अग्निजस्का रंदावास्काला धूळ चारली. तिने वेगवान खेळी करून सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-1 अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने विजेतेपद आपल्या नावे केले.


पेनेट्टाला विजयासाठी अंतिम सामन्यात एक तास 13 मिनिटे झुंज द्यावी लागली. यात बाजी मारून तिने दुस-या मानांकित रंदावास्काचे किताब पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. त्यामुळे पोलंडच्या खेळाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यासाठी तिने पहिल्या सेटमध्ये प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, इटलीच्या खेळाडूने बाजी मारली.


दहावे विजेतेपद
पेनेट्टाचा इंडियाना मास्टर्सचा किताब हा करिअरमधील दहावा ठरला. तिने गत 2010 मध्ये शेवटचे नववे डब्ल्यूटीएचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, त्यानंतर तब्बल दोन वर्षे मनगटाच्या गंभीर दुखापतीमुळे तिला अपयशाचा सामना करावा लागला.


ली, स्टोसूरचा पराभव
इटलीच्या फ्लेविया पेनेट्टाने अव्वल खेळाडूंना धूळ चारून इंडियाना मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला होता. यात जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेल्या ली ना आणि माजी अमेरिकन ओपन चॅम्पियन स्टोसूरचा समावेश आहे.