आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indiana Wells Tennis Competition News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोवाक योकोविक तिसर्‍या फेरीत; मास्टर्स टेनिस स्पर्धा; बर्डिच, त्सोंगा बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियाना वेल्स- जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेला नोवाक योकोविक आणि चौथ्या मानांकित अग्निजस्का रंदावास्काने इंडियाना वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत शानदार विजय मिळवला. या विजयासह योकोविकने तिसरी फेरी गाठली. रंदावास्काने चौथ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे टॉमस बर्डिच व ज्यो विल्फ्रेड त्सोंगाला पराभवाचा सामना करावा लागला.

टॉमस बँडच, त्सोंगा पराभूत :
चौथ्या मानांकित टॉमस बर्डिच आणि नवव्या मानांकित ज्यो विल्फ्रेड त्सोंगाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. स्पेनच्या रॉबर्टा बतिस्टाने रंगतदार लढतीत बर्डिचला 4-6, 6-2, 6-4 ने हरवले. ज्युलियन बेनेटियूने त्सोंगावर 6-4, 6-4 ने मात केली.

रंदावास्काची एनिकावर मात :
पोलंडच्या रंदावास्काने तिसर्‍या फेरीत एनिका बेकवर एकतर्फी विजय मिळवला. तिने 6-0, 6-0 ने सामना जिंकला. फ्रान्सच्या कार्नेटला विजयासाठी तीन तास 26 मिनिटे झुंज द्यावी लागली. तिने कार्ला सुआरेजवर 6-7, 7-5, 6-3 ने मात केली.

पेस-रांदेकचा रोमहर्षक विजय
भारताचा लिएंडर पेस आणि रादेक स्तेपानेकला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या चौथ्या मानांकित जोडीने लढतीत पोलंडच्या जेर्जी जानेविच आणि र्जमनीच्या फिलिपचा पराभव केला. त्यांनी 7-6, 3-6, 10-5 ने विजय मिळवला. यासाठी या चौथ्या मानांकित जोडीला 64 मिनिटे झुंज द्यावी लागली.

सहज विजय
सर्बियाच्या योकोविकने रोमानियाच्या व्हिक्टर हनेस्क्यूचा पराभव केला. त्याने 7-6, 6-2 ने सामना जिंकला. पहिल्या सेटमध्ये रोमानियाच्या खेळाडूने योकोविकला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फार काळ आव्हान कायम ठेवता आले नाही. आता योकोविक आणि गोंजालेज समोरासमोर असतील.