आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Come Back Not Come Into Reality, International Olympic Committee Unhappy

भारताचे ऑलिम्पिकमधील पुनरागमन अडचणीत, आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समिती नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्युनस आयस - भारतीय ऑलिम्पिक संघाच्या (आयओए) आरोपी सदस्याला निवडणुक रिंगणात उतरवण्याचा नवीन प्रस्ताव आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) फेटाळून लावला. आयओसीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता भारताच्या ऑलिम्पिकमधील पुनगरामनाच्या शक्यतेला मोठा धक्का बसला आहे. हा वाद मिटल्याशिवाय भारतीय खेळाडूंना राष्‍ट्रध्वज तिरंगाखाली खेळण्याची संमती मिळणार नाही. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ध्वजासह खेळावे लागणार आहे.


ब्युनस आयर्समध्ये आयओसीने आपल्या 125 व्या सत्रापूर्वी, बुधवारी कार्यकारी मंडळाच्या (इबी) बैठकीत आयओएचा प्रस्ताव फेटाळला. तसेच नव्या नियमानुसार निवडणुका घेण्याचेही आदेश दिले आहेत. आयओएने 25 ऑगस्टला आपल्या विशेष सर्वसाधारण सभेत दोनपेक्षा अधिक वर्षांची शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला आयओएची निवडणुक लढवण्याचा आणि ऑलिम्पिकमधील प्रवेश रोखण्याचा प्रस्ताव आयओसीकडे पाठवण्यात आला होता.


चीन येथील यूथ एशियन स्पर्धेत तीन सुवर्ण जिंकल्यानंतर भारताचे राष्‍ट्रगीत म्हटल्या गेले नाही. भारतीय संघ ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या ध्वजाखाली सहभागी झाला होता.


आयओसीचे महत्वाचे मुद्दे
1. भारतीय ऑलिम्पिक समितीने तत्काळ आपल्या घटनेत नव्याने बदल करावेत.
2. गुन्हेगार आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिका-यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यात यावे.
3. आयओएच्या 25 ऑगस्टला झालेल्या बैठकीदरम्यान आराखड्याचा सल्ला दिला होता आणि पर्यवेक्षकही पाठवले होते. मात्र, कलमांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
4. आयओसी लवकरच आयओएला अधिसूचना पाठवेल.


का झाले होते निलंबन?
राष्‍ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2010मधील भ्रष्टाचाराचे आरोपी ललित भानोत यांची आयओए महासचिवपदी निवड झाल्याने आयओसीने आक्षेप घेतला आणि आयओएला डिसेंबर 2012 पर्यंत निलंबित केले.
आयओएची विरोधी भूमिका कायम
आम्ही देशाच्या कायद्याविरुद्ध जाऊ शकत नाही. देशाच्या घटनेनुसारच आम्ही आमचे नियम ठरवणार आहोत. यापूर्वीच आम्ही आयओसीच्या दोनसदस्यीय प्रातिनिधिक मंडळाला यांसंबंधीची माहिती दिली होती.
अभयसिंग चौटाला, निलंबित आयओएचे अध्यक्ष.


सर्व देशांसाठी नियम लागू
आयओसीचा गुन्हेगार उमेदवाराला विरोध आहे. अशा व्यक्तीचा क्रीडा समितीमध्ये समावेश नसावा, याला आमचीही संमती आहे. मात्र, हा नियम सर्व देशांसाठी एकसारखा लागू करण्यात यावा. एकमेव भारतासाठी नसावा.
विजयकुमार मल्होत्रा, आयओएचे माजी कार्यकारी अध्यक्ष