आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Fourth Victory In Fed Cup Tennis Tournament

फेड चषक टेनिस : भारतीय महिला टीमचा शानदार विजयी चाैकार, फिलिपाइन्सवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - यजमान भारतीय महिला संघाने घरच्या मैदानावरील दबदबा कायम ठेवताना शनिवारी अाशिया/अाेशियाना ग्रुप-२ च्या फेड चषक टेनिस स्पर्धेत विजयी चाैकार मारला.
जगातील नंबर वन सानियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी फायनलमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. यजमानांनी फिलिपाइन्सचा २-१ ने पराभव केला. भारताचा हा सलग चाैथा विजय ठरला. प्रार्थनाने एकेरीपाठाेपाठ दुहेरीतही विजयाचा धमाका उडवला.

अंकिताचा पराभव : भारताची नंबर वन अंकिता रैनाला दुसऱ्या सामन्यात फिलिपाइन्सच्या कॅथरिनाकडून पराभव झाला. तिला ६-२, ५-७, ५-७ ने पराभवाला सामाेरे जावे जावे लागले.

प्रार्थनाचे दुहेरी यश
प्रार्थना ठाेंबरेने दुहेरी यश संपादन केले. तिने एकेरी पाठाेपाठ दुहेरीतही विजयाची नाेंद केली. तिने एकेरीत तिने अॅना क्लारिसे पाट्रिमाेनियाेवर ६-३, ६-१ ने मात केली. तसेच तिने सानियासाेबत फिलीपाईन्सच्या लेहनेर्ट अाणि प्राटाेमिनिचा पराभव केला. त्यांनी ६-३, ६-३ ने विजय मिळवला.