आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India’s Greatest Sports Person News In Marathi

15\'AUG SPL: या क्रीडापटूंनी भारताची जगात वाढविली शान, जाणून घ्‍या त्‍यांच्‍याविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 ऑगस्‍ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्‍या जातातून मुक्‍त झाला. स्‍वातंत्र्य झाला. भारताने प्रत्‍येक क्षेत्रात दैदीप्‍यमान यश मिळविले आहे. त्‍यामध्‍ये खेळामध्‍येही आपण प्रगतीपथावर आहोत. काही खेळाडूंनी केलेल्‍या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहे. भलेही लोकसंख्‍येच्‍या मानाने आपली प्रगती कमी आहे. परंतु एवढीही कमी नाही. इतरांच्‍या तुलनेत आपली वाटचाल प्रगतीपथावर आहे.
आज या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तुम्‍हाला भारतीय निवडक क्रिडापटूंची संक्षिप्‍त ओळख करुन देणार आहोत.

मेजर ध्यानचंद
हॉकी म्हटले की मेजर ध्यानचंद हे नाव सर्वात प्रथम डोळ्यांसमोर येते.ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप. ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. आज ते हयात नाही पण त्यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा भारतात खेल दिन (National Sport Day ) म्हणून साजरा होतो.
1926 च्या नुझीलंड दौ-यात एकूण 21 सामने खेळणा-या भारतीय संघातर्फे 192 गोल झाले त्यातील 100 गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. 1928 साली झालेल्या ऑल्मपिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने 29 गोल केले होते. या स्पर्धेचा हिरो होता ध्यानचंद.
1928 च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध 3-0 अशा जिंकलेल्या सामन्यात, 3 पैकी दोन गोल ध्यानचंद होते. 1932 च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेस तर 23 - 1 अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक 2003 पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने 8 गोल केलेले होते. हंगेरी विरुद्ध 4-0, अमेरिका 7-0, जपान 9-0 असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध 10-0 असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध 8-1असा जिंकला. हिटरने त्यांच्या सैन्यात वरच्या हुद्द्यावर दिलेली नोकरी त्यांनी स्वाभिमानाने आणि देशप्रेमामुळे नाकारली.
पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, मिल्‍खा सिंग विषयी