आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची विजयी हॅटट्रिक, फेड चषक टेनिस स्पर्धा; अंकिता, प्रार्थनाची लय कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - भारतीय संघाने अाशिया/अाेशियाना ग्रुप-२ च्या फेड चषक टेनिस स्पर्धेत विजयाची हॅट््ट्रिक केली. भारताने स्पर्धेच्या सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी विजयाची नाेंद केली. यजमान संघाने तुर्कमेनिस्तानचा २-० अशा फरकाने पराभव केला. युवा खेळाडू प्रार्थना ठाेंबरे अाणि अंकिता रैनाच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला. भारताचा हा तिसरा विजय ठरला.

अाशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या प्रार्थनाने अापल्या पहिल्या सामन्यात बाजी मारून भारताला १-० ने अाघाडी मिळवून दिली. तिने जहाना बेरामाेवाचा २१ मिनिटांत पराभव केला. तिने ६-०, ६-२ अशा फरकाने विजय मिळवला.
एनास्तासिया पराभूत
भारताची नंबर वन अंकिताने एनास्तासिया फ्रेंकाेवर ६-१, ६-२ ने मात केली. तिने ५२ मिनिटांत सामना जिंकला.