आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियाना वेल्स टेनिस किताब राफेल नदालने जिंकला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियाना वेल्स- पाचव्या मानांकित राफेल नदालने इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. स्पेनच्या खेळाडूने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेत्रोला धूळ चारली. त्याने ही लढत 4-6, 6-3, 6-4 ने जिंकली. यासह त्याने जागतिक क्रमवारीत चौथे स्थान गाठले.


11 वेळचा ग्रॅँडस्लॅम विजेत्या नदालने दोन वर्षांनंतर प्रथमच हार्ड कोर्टवर विजेतेपद पटकावले. यापूर्वी त्याने 2010 मध्ये चषक जिंकला होता. त्याचे इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेचे हे करिअरमधील तिसरे विजेतेपद ठरले.
मियामी मास्टर्समधून नदालची माघार - पुढच्या आठवड्यात अमेरिकेत होणाºया मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतून नदालने माघार घेतली. तो या स्पर्धेचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर आहे. त्याने घेतलेल्या निर्णयामुळे आयोजक नाराज झाल्याची माहिती मियामी सोनी ओपन स्पर्धेचे संचालक अ‍ॅडम बॅरेट यांनी दिली. सात महिन्यांनंतर नदालने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले आहे.

सत्रातील 15 वा विजय- स्पेनच्या राफेल नदालने हार्ड कोर्टवर तब्बल एका वर्षांनंतर विजय मिळवला. त्याने माजी यूएस ओपन चॅम्पियन डेल पेत्रोविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करून दोन सेट जिंकले. नदालचा हा या सत्रातील 15 वा विजय ठरला. त्याने केवळ एक सामना गमावला. त्याचा हा 22 वा मास्टर्स आणि 53 वा एटीपी चषक ठरला.