आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indo Pak Hockey Series Called Off After Govt's Objection

भारत-पाक हॉकी मालिका भारत सरकारकडून रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारत आणि पाकिस्‍तानातील वाढता तणाव स्‍पष्‍ट होत आहे. भारताने पाकिस्‍तानच्‍या हॉकी संघाचा भारत दौरा रद्द केला आहे. दोन्‍ही देशांमध्‍ये होणा-या मालिकेला भारत सरकारने परवानगी नाकारल्‍यानंतर हॉकी इंडियाने हा निर्णय घेतला आहे.

हॉकी इंडियाच्‍या एका उच्‍चपदस्‍थ अधिका-याने यासदंर्भात माहिती दिली. त्‍यांनी सांगितले की, परराष्‍ट्र मंत्रालयाने भारत-पाकिस्‍तानातील हॉकी मालिका रद्द करण्‍याचे निर्देश दिले होते. परराष्‍ट्र मंत्रालयाने द्विपक्षीय मालिकेला परवानगी दिली नाही. पाकिस्‍तानच्‍या संघाला भारतात आमंत्रित करु नका तसेच भारतीय संघालाही त्‍या देशात पाठवू नका, असे निर्देश परराष्‍ट्र मंत्रालयाने दिले होते. यासंदर्भात काल रात्री परराष्‍ट्र मंत्रालयाकडून फॅक्‍स पाठविण्‍यात आला होता.

पाकिस्‍तानचा संघ एप्रिलमध्‍ये 5 सामने खेळण्‍यासाठी भारतात येणार होता. त्‍यानंतर 23 एप्रिलपासून भारतीय संघ पाकिस्‍तानला जाणार होता. या मालिकेमुळे तब्‍बल 7 वर्षांनी दोन्‍ही देशांमध्‍ये हॉकी मालिका खेळविली जाणार होता. यापूर्वी 2006 मध्‍ये भारत-पाकिस्‍तान हॉकी सामन्‍यांची मालिका झाली होती.