आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्णभेदाने त्रस्त झाला हा इंडियन क्रिकेटर, लोकांना म्हणाला, छोटी सोच बदलो!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनवने हे ही स्पष्ट केले की, या पोस्टचा टीम इंडियाशी कोणताही संबंध नाही. - Divya Marathi
अभिनवने हे ही स्पष्ट केले की, या पोस्टचा टीम इंडियाशी कोणताही संबंध नाही.
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय कसोटी संघातील सलामीवीर अभिनव मुकुंदने वर्णभेदाने त्रस्त होत सोशल मीडियात त्याच्या रंगावरून अभद्र टिप्पणी करणा-या लोकांना सुनावले. मुकुंदने बुधवारी रात्री एक मॅसेज सोशल मीडियात शेयर करत त्याने आणखी 5 ट्विट केली. त्यात त्याने लिहले की, मी जी काही लिहत आहे ते फक्त माझ्या रंगावर टिप्पणी करणा-या लोकांसाठी. याला भारतीय टीम किंवा इतर कोणत्या राजकारणाशी जोडू नये. छोटी सोच बदलें लोग...
 
- अभिनव मुकुंदने या पोस्टमध्ये लिहले की, “मी 10 वर्षापासून क्रिकेट खेळत आहे व हळू हळू इथपर्यंत प्रवास केला आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पण ही पोस्ट तुमचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी लिहत नाही. तर यासाठी लिहत आहे की, यामुळे लोकांचे विचार बदलतील.”
-मुकुंद पुढे लिहतो की, मी लहानाचा मोठा होताना लोकांच्या माझ्या शारीरिक रंगाबाबतच्या टिप्पण्या ऐकत आलो आहे.  15 वर्षापासून मी देशात व देशाबाहेर फिरलोय. जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हा एकच विचार मनात येतो तो म्हणजे, माझ्या सावळ्या रंगावरून तिरकस कमेंट करायला लोकांना कसली मजा येते.
- खरं तर हे क्रिकेट खेळणारेच समजू शकतात. मी लहानपणापासून उन्हात क्रिकेट खेळत आलो आहे. पण मला एकदाही वाटले नाही की, यामुळे माझा रंग काळा पडत चालला आहे. कारण मला माहित आहे मला जे आवडते तेच मी करतो. जे लोक सोशल मीडियात माझ्यासारख्या लोकांवर वर्णभेदाची टिप्पणी करतात त्यांनी आपली छोटी सोच बदलली पाहिजे. सोशल मीडियात हे जरा जास्तच होत आहे.
- यानंतर सोशल मीडियात फॅन्सनी सुद्धा अभिनव मुकुंदला जोरदार समर्थन दिले. आपल्याला माहित असेलच की, श्रीलंकेतील दुस-या कसोटीत अभिवन मुकुंदच्या जागेवर के एल राहुलला टीममध्ये स्थान देण्यात आले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अभिनव मुकुंदने आणखी काय काय म्हटले व त्याच्या पोस्टवर आलेल्या सोशल मीडियातील रिअॅक्शन...
बातम्या आणखी आहेत...