स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा क्रिकेटर इरफान पठानने एक फोटो शेयर करत वाद ओढवून घेतला आहे. पठानने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पत्नी सफाचा एक फोटो शेयर केला. ज्यात त्याने लिहले की, 'कुछ तो लोग कहेंगे...'. फोटो व्हायरल होताच छोटे पठान साहब सोशल मीडियात ट्रोल होऊ लागले. अनेक यूजर्सनी त्यांना चुकीचे ठरवत असे फोटो परत शेयर ना करण्याचा सल्ला दिला. काय आहे या फोटोत...
- या फोटोत त्याची पत्नी सफा बुर्का आणि हिजाबमध्ये तर दिसत आहे मात्र तिचा चेहरा उघडा आहे. ज्यात सफाने आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी चेहरा झाकला आहे. फोटोत केवळ तिचे डोळे आणि हात दिसत आहेत.
- कट्टरवादी लोकांना तिचे मोकळे हात आणि बोटांवर लावलेले नेल पॉलिश ठीक वाटले नाही. ज्यानंतर त्यांनी पठाणला धार्मिक सल्ला देणे सुरु केले. घरातील महिलेचा फोटो असा शेयर करत नाहीत असेही सुनावले.
- या यूजर्सचे म्हणणे आहे की, हे सर्व आपल्या धर्मात चुकीचे मानले जाते. तर काहींनी इरफानला पाठिंबा देताना सल्ला देणा-यांची भरपूर खेचली आहे.
- इरफान पठानला या गोष्टीचा आधीच अंदाज होता त्यामुळेच त्याने फोटोला कॅप्शन देताना लिहले की, 'कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना बट ऑलवेज #लव #ट्रेवल'.
- इरफान पठाणच्या पत्नीचे नाव सफा बेग आहे, जी एक मॉडेल राहिली आहे. या दोघांचे लग्न फेब्रुवारी 2016 मध्ये झाले होते. या कपलला आता एक मुलगा आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटो शेयर केल्यानंतर इरफान कसले कसले सल्ले मिळताहेत....