स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी स्फोटक बॅट्समन शाहिद आफ्रिदीने भारताला स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक मॅसेज लिहित भारताला शुभेच्छा दिल्या. सोबतच हे ही लिहले की, दोन्ही देशांनी शांती, सहिष्णुता आणि एकमेंकाच्या सामजस्यांसाठी काम करत राहावे. यानंतर नोबल पुरस्कार जिंकणारी पाकिस्तानची मलाला यूसुफजईने सुद्धा शाहिदच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. काय लिहले आफ्रिदीने...
- शाहिद आफ्रिदीने ट्विट करत लिहले की, 'हॅप्पी इंडिपेंडेंस डे भारत! शेजारी बदलण्याचा कोणताही पर्याय नसतो. या, आपण एकत्र मिळून शांती, सहिष्णुता आणि आपपासातील स्नेहासाठी काम करू. मानवतेला पुढे नेऊया.'
- आफ्रिदीच्या या टि्वटनंतर दोन्ही देशातील लोकांनी त्याचे जोरदार कौतूक केले तसेच दोन्ही देशातील संबंध सुधारावेत अशी इच्छा व्यक्त केली. दोन्ही देशातील संबंधांना व कटवडपणाला राजकारण जबाबदार असल्याचेही म्हटले.
मलालाने सुद्धा केले समर्थन-
- आफ्रिदीच्या या टिवटनंतर नोबल पुरस्कार जिंकणारी पाकिस्तानी युवती मलाला यूसुफजईने त्याला सपोर्ट केले. मलालाने
आफ्रिदीचे ट्विट रिट्वीट करत लिहले की, 'भारताला स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शाहिद आफ्रिदीचे म्हणणे एकदम बरोबर आहे. आपल्या सर्वांना शिक्षण आणि शांतीसाठी एकमेंकानी एकत्र येत हातात हात घालून काम केले पाहिजेय.'
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आफ्रिदीच्या टि्वटनंतर सोशल मीडियात आलेल्या रिअॅक्शन्स...