आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी शास्त्रींवर कित्येक तरूणी होत्या फिदा, जाणून घ्या 12 इंटरेस्टिंग फॅक्ट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची वर्णी लागली आहे. रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या हेड कोच पदावर वर्णी लावण्यासाठी बीसीसीआयमधील काही पदाधिकारी व विराट कोहलीने लॉबिंग केले आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा असतानाच त्यांचे नाव जाहीर झाले आहे. 
 
वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, लालचंद रजपूत, रिचर्ड पायबस यांच्यासारख्या दिग्गजांना डावलून सचिन, सौरव व लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने शास्त्री यांच्या नावावर मोहोर उमटवली. गेल्या वर्षी प्रशिक्षक पदाच्या मुलाखतीदरम्यान व नंतर रवी शास्त्री व सौरव गांगुली यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे रवी शास्त्री चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा कोच म्हणून वर्णी लागल्याने चर्चेत आहेत. यानिमित्ताने आपण रवी शास्त्री यांच्या पर्सनल लाईफवर एक नजर टाकूया. 80- 90 च्या काळात रवी शास्त्री हे तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. अनेक मुली त्यांना लग्नासाठी मागणी घालायच्या. पण शास्त्री यांनी त्याआधीच जीवनातील आपली साथीदार मिळवलेली होती. आईने केला होता खुलासा...
 
- रवी शास्त्रींच्या आईने एका मुलाखतीत खुलासा करताना म्हटले होते की, रवी मुलींमध्ये खूप लोकप्रिय होता. त्या काळी देखील त्याला अनेक तरूणीची पत्रे यायची.  
- एक काळ तर असा होता की, शास्त्रींकडे अनेक चांगले मॅरेज प्रपोजल होते. जेव्हा घरच्यांनी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी आयुष्यात कोणीतरी असल्याचे सांगितले होते. 
- ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती तर त्या होत्या रितू सिंह, त्यांच्याशीच शास्त्री यांनी विवाह केला होता. 
- 27 मे 1962 ला मराठी कुटुंबात जन्मलेल्या शास्त्री यांना 2008 मध्ये एक मुलगी झाली होती.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, रवी शास्त्री यांच्या जीवनाशी संबंधित असेच काही Facts
बातम्या आणखी आहेत...