Home »Sports »Latest News» Information About Icc Player Rankings

FACTS: आयसीसी प्लेअर रँकिंग

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 16:54 PM IST

  • FACTS: आयसीसी प्लेअर रँकिंग

आयसीसी प्लेअर रँकिंग सिस्टिममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची अलीकडील प्रदर्शनाच्या आधारावर निवड केली जाते. यामध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचे फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची वेगवेगळी गुणवत्ता प्रसिद्ध होते.

* 1987 मध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू राल्फ डेक्स्टर यांच्या सल्ल्यानंतर आयसीसी क्रमवारीची सुरुवात झाली. ते म्हणाले होते की, खेळाडूंची निवड संपूर्ण करिअरच्याच नाही तर अलीकडील प्रदर्शनाच्या आधारेच झाली पाहिजे.

* 1998 मध्ये एकदिवसीय सामन्यांसाठी आयसीसी प्लेअर रँकिंगची सुरुवात झाली होती. यापूर्वी केवळ कसोटी क्रिकेटमध्ये क्रमवारी दिली जात होती; परंतु नंतर एकदिवसीय सामन्यांमध्येसुद्धा याची मागणी व्हायला लागली.

* 2015 पर्यंत रिलायन्स मोबाइल कंपनी आयसीसी प्लेअर रँकिंगची अधिकृत प्रायोजक आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय परिषदेसोबत करार केला आहे. अशी क्रमवारी महिला क्रिकेटमध्येदेखील असते.

प्रदर्शनाद्वारे मिळतात गुण


आयसीसी प्‍लेअर रॅकिंगमध्‍ये खेळाडूंना प्रदर्शनाच्‍या हिशोबाने 0 ते 1000 गुणांच्‍या स्‍कलेवर रेटिंग दिली जाते. जर खेळाडूचे प्रदर्शन मागच्‍या सामन्‍यांच्‍या तुलनेत चांगले असेल तर त्‍याचे गुण वाढवले जातात. तसेच जर खेळाडूचे प्रदर्शन मागील सामन्‍यांच्‍या तुलनेत खराब असेल तर त्‍याचे गुण कमी केले जातात. सामन्‍याच्‍या वेगवेगळया स्थितींच्‍या हिशोबाने खेळाडूंचे प्रदर्शन एक अल्‍गोरिदमच्‍या मदतीने मोजले जाते.
Next Article

Recommended