आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झिम्बाब्वे दौ-यात अमित मिश्राने केली कमाल पण गेल्या १० वर्षात खेळला केवळ १८ वनडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान झालेली एकदिवसीय मालिका भारताने जिंकली आहे. या मालिकेत अमित मिश्राने पाच सामन्यांमध्ये सर्वाधिक 18 बळी घेतले. जाणून घेऊया अमितच्या क्रिकेट प्रवासाविषयी..

2001 मध्ये 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना त्याने आपल्या गोलंदाजीने सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे निवड समितीची त्याच्यावर नजर पडली. त्यानंतर त्याला हरियाणाकडून रणजी ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली. चांगल्या कामगिरीमुळे 2002 मध्ये वेस्ट इंडीजच्या भारत दौर्‍यासाठी त्याची निवड करण्यात आली. मात्र, त्यावेळी अंतिम 11 मध्ये तो जागा बनवू शकला नाही. एप्रिल 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळण्याची संधी त्याला मिळाली.