आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जाणून घ्‍या वादग्रस्‍त यूडीआरएस सिस्टिमबद्दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जात असलेल्या अँशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात यूडीआरएस प्रणालीवर योग्य निर्णय देण्यात आला नाही. परिणामी ही प्रणाली वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. यूडीआरएस म्हणजे काय याची ही लक्षवेधक माहिती.

काय आहे यूडीआरएस

यूडीआरएस म्हणजे अम्पायर डिसीजन रिव्हू सिस्टिम. मैदानावरील पंचाने दिलेल्या निर्णयाची समीक्षा करणारी ही प्रणाली आहे. यात पंचांनी दिलेला निर्णय मान्य नसल्यास खेळाडू किंवा संघ तिसर्‍या पंचाकडे याला आव्हान देतात. यानंतर तिसरे पंच मैदानावरील पंचांनी दिलेल्या निर्णयाची समीक्षा करून निर्णय देतात. या प्रणालीचा वापर करायचा असल्यास संघ किंवा खेळाडू दोन्ही हातांनी ‘टीज’ चिन्हाने इशारा करतो. यानंतर तिसरे पंच याविषयी पाहणी करतात.