आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACTS: वेगाचा बादशाह \'उसेन बोल्ट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमैकाचा प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टची तिसर्‍यांदा ‘लॉरियस अवॉर्ड’ मध्ये सवरेत्कृष्ट धावपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. बोल्टला आतापर्यंतचा जगातील सर्वात वेगवान धावपटू मानले जाते. ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्णपदक जिंकणारा तो जगातील पहिला धावपटू आहे. त्याने पाचवेळा जागतिक विजेतेपद पटकावले आहे. एवढेच नाही तर ऑलिंम्पिकमध्ये तीन श्रेणींमध्ये धावण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावे आहे. त्याने बर्लिनमध्ये 2009 मध्ये 100 मीटर धावण्याची स्पर्धा केवळ 9.58 सेकंदात जिंकली होती. बोल्ट अत्यंत शांत स्वभावाचा धावपटू असून त्याला नृत्य करायला आणि गाणी म्हणायलादेखील आवडते. तो मास्टर ब्लास्टर सचिनचा मोठा चाहता आहे.

वडील भाजी विक्री करतात

जमैकातील शेरवूड कंटेंट या छोट्याशा गावात राहणारे बोल्ट अत्यंत साधारण कुटुंब आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर जगभरात प्रसिद्ध झाल्यानंतर आजही बोल्टचे वडील वेलेस्ली बोल्ट रेशन दुकान चालवतात आणि भाजी व मासे विकतात. हे काम करू नका, असे बोल्ट वडिलांना सांगतो; परंतु मला हे आवडते, असे त्याचे वडील म्हणतात.

1977 मध्ये धावण्याच्य शर्यतीदरम्यान ऑटोमॅटिक टाइम मेझरमेंटचा नियम लागू करण्यात आला होता. त्यानंतर 100 मीटर आणि 200 मीटर दोन्हीही प्रकारातील शर्यतींचा विश्वविक्रम आपल्या नावे असणारा उसेन बोल्ट जगातील पहिला धावपटू आहे.