Home | Sports | Other Sports | injured butia

भुतिया घेणार लवकरच संन्यास !

वृत्तसंस्था | Update - Aug 19, 2011, 02:22 AM IST

गंभीर दुखापतीने वैतागलेला भारतीय माजी कर्णधार व स्टार स्ट्रायकर बायचुंग भुतिया

  • injured butia

    दिल्ली । गंभीर दुखापतीने वैतागलेला भारतीय माजी कर्णधार व स्टार स्ट्रायकर बायचुंग भुतिया आगामी काळात संन्यास घेण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे. गेल्या जानेवारी महिन्यात खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात अवघी 15 मिनिटे खेळलेल्या भुतियाने दोन-तीन दिवसातच निवृत्तीच्या घोषणेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भुतियाच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिक्कीम क्लबच्या 34 वर्षीय भुतियाने भारतीय संघाकडून 109 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 49 गोल नोंदवले आहेत.

Trending