आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Injured Dhoni To Celebrate Anniversary With Sakshi

दुखापतीमुळे धोनी तिरंगी मालिकेतून \'आऊट\', रायडू \'इन\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चॅम्पियन्‍स ट्रॉफी जिंकून विंडीजवर स्‍वारी करण्‍यासाठी गेलेल्‍या टीम इंडियाला धक्‍का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दुखापतीमुळे विंडीज येथे सुरू असलेल्‍या तिरंगी मालिकेतून बाहेर व्‍हावे लागले आहे. यजमानांविरूद्धच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात तो जायबंदी झाला होता. त्‍यामुळे त्‍याला क्षेत्ररक्षणही करता आले नव्‍हते. त्‍यामुळे टीम इंडियाचे कर्णधारपद विराट कोहलीने सांभाळले होते. या सामन्‍यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. प्रभारी कर्णधार कोहलीनेही धोनीची कमतरता जाणवल्‍याचे म्‍हटले होते. परंतु, प्रत्‍येक दु:खात काही आनंदाचे क्षणही असतात, असे म्‍हटले जाते. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सध्‍या याचाच प्रत्‍यय येताना दिसतोय.

धोनीसाठी ही दुखापत एक वरदान ठरली आहे. याच महिन्‍यात 4 तारखेला त्‍याच्‍या लग्‍नाचा तिसरा वाढदिवस आहे. त्‍यानंतर 7 तारखेला त्‍याचा वाढदिवसही आहे. दुखापतीमुळे धोनी टीमपासून दूर जाईल पण त्‍याला आपली पत्‍नी साक्षीच्‍या जवळ जाण्‍याची संधी मिळाली आहे.

धोनीच्‍या अनुपस्थितीत दिनेश कार्तिकला यष्‍टीरक्षण करावे लागले होते. भारताला एका गडयाने हा सामना गमवावा लागला होता. टीम इंडियाला मंगळवारी याच मैदानावर श्रीलंकेशी लढावे लागणार आहे. दोन्‍ही संघांना अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्‍याचबरोबर फलंदाज आणि यष्‍टीरक्षक अंबाती रायडूला धोनीच्‍या जागी संधी मिळाली आहे.