आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Injured Mark Boucher Retires From International Cricke

दुखापतग्रस्त मार्क बाउचरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - दक्षिण आफ्रिका संघाचा यष्टीरक्षक मार्क बाऊचर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज निवृत्ती घेतली आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात डाव्या डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार स्मिथने बाउचरने लिहलेले पत्र मीडियासमोर वाचून दाखवले. ज्यामध्ये बाऊचरने सांगितले आहे की, माझ्या डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे भविष्यात मी क्रिकेट खेळू शकणार नाही.
इंग्लंडचा फलंदाज हुसैन हा लेग स्पिनर इम्रान ताहीर याच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला, त्या चेंडूमुळे उडालेली बेल्स बाऊचरच्या डोळ्याला लागून त्याच्या बुबुळाला गंभीर दुखापत झाली.लंडनमध्येच बाऊचरच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बाउचरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत बाऊचरने १४७ कसोटी सामने आणि २९५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

रागाच्या भरात निवृत्तीचा निर्णय - सौरव गांगुली