आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Injured Ravindra Jadeja Still In Contention For World Cup Spot

रवींद्र जडेजा विश्वचषक स्पर्धेआधी तंदुरुस्त; चर्चेवर पडदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला झालेली दुखापत फारशी गंभीर नसून त्याचा आगामी विश्वचषक क्रिकेट संघासाठीच्या भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता बीसीसीआयच्या एका पदाधिकार्‍याने व्यक्त केली.

‘दिव्य मराठी’शी बोलताना या पदाधिकार्‍याने सांगितले, भारतीय संघाच्या जडेजाला चार आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. तो अवधी पूर्ण झाला आहे. चेन्नई येथील श्रीराम मेडिकल कॉलेजमधील स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये तो सध्या उपचार घेत आहे.

येत्या ६ जानेवारी रोजी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर होणार आहे. त्या संघात रवींद्र जडेजा याचे नाव निश्चितच असेल, असेही या पदाधिकार्‍याने सांगितले. रवींद्र जडेजा हा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड-भारत यांच्यातील तिरंगी मालिकेसाठी तंदुरुस्त होईल किंवा नाही, याबाबत या अधिकार्‍याने शंका व्यक्त केली. येत्या १८ जानेवारीपासून तिरंगी मालिकेला प्रारंभ होणार आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेपूर्वी जडेजा फिट होईल, असा विश्वासही व्यक्त केला. विश्वचषक स्पर्धेसाठी जडेजा फिट झाला नाही तर त्याच्या बदली खेळाडू देण्याची मुभा असल्याचेही या अधिकार्‍याने पुढे सांगितले.

खांद्याला दुखापत
सध्या रवींद्र जडेजा खांद्याच्या गंभीर दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या या ऑलराउंडरचे आगामी विश्वचषकात खेळणे काही प्रमाणात अनिश्चित मानले जात आहे. मात्र, या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला चार आठवड्यांच्या विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला होता. त्यासाठी ताे मागील महिनाभरापासून विश्रांती घेत आहे. त्यामुळे त्याचा आगामी विश्वचषकातील प्रवेश निश्चित असल्याचे चित्र आहे.

युवराज प्रबळ दावेदार !
२०१५ विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या जाहीर झालेल्या संभाव्य ३० जणांच्या यादीतून युवराजला डच्चू देण्यात आला. मात्र, त्याने यावर नाराजी व्यक्त केली नाही. दरम्यान, त्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने त्यामुळे जडेजाच्या जागी संघात स्थान मिळवण्यासाठीचा दावा मजबूत केला.