आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांतरविद्यापीठ क्रीडा महाेत्सव : आंतरराष्ट्रीय खेळाडू वाढवणार रंगत..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुरुवारपासून डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठात १८ व्या राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महाेत्सवाला प्रारंभ हाेत अाहे. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग निश्चित केल्याने रंगत आणि रोमांच वाढला आहे. सुवर्णपदकासाठी पुणे, मुंबई, यजमान विद्यापीठ, कोल्हापूरच्या संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू सज्ज झाले आहेत.
या आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी दोन हात करण्यासाठी इतर विद्यापीठांच्या खेळाडूंनी जोरदार तयारी केली असल्याने स्पर्धेत थरार पाहायला मिळेल. महोत्सवासाठी मुंबई आणि कोल्हापूरच्या खेळाडूंचे मंगळवारी उशिरा शहरात आगमन झाले आहे. बुधवारी सर्व संघांचे खेळाडू डेरेदाखल होतील. सहा दिवस चालणाऱ्या स्पर्धेला गुरुवारपासून सकाळी सुरुवात होईल.

स्टार वॉर
मुलांच्याकबड्डी गटात कोल्हापूरच्या संघात स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडू सुहास वगरेसह चार राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. वगरेवर संघाची सर्व भिस्त असली तरी त्याने संघाची उत्तम बांधणी केल्याने कोल्हापूरला मात देणे कठीण आहे. यजमान विद्यापीठाच्या संघात आंतरराष्ट्रीय अॅथलीट मिसबाह सौदागर हा ४०० मीटरचा महत्त्वाचा खेळाडू आहे.

मुंबईला धक्का
यंदा१८ व्या क्रीडा महोत्सवात सहभागी होणाऱ्या मुंबई संघात राष्ट्रीय खेळाडूंची संख्या अधिक आहे. राष्ट्रीय खेळाडू मंदार गाैरव अामरे, ममता हुलके अाणि सनी पाटील यांच्यावर मुंबई संघ अवलंबून असेल. मुंबई संघात अनुभवी खेळाडूंचा वानवा असल्याने यंदा कोल्हापूर विद्यापीठ, यजमान विद्यापीठ, नागपूर विद्यापीठाला विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.

पूजा, भाग्यश्री, अनीशवर मदार
पुणेसंघाच्या अॅथलेटिक्स संघाची मदार ज्युनियर आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजा वराडे, भाग्यश्री शिर्के, अनीश जोशीवर राहणार आहे. त्याचप्रमाणे मुलींच्या बास्केटबॉल संघात ईश्वरी पिंगळे आणि श्रुती नेनम या ज्युनियर भारतीय संघाच्या खेळाडू प्रमुख आकर्षण राहतील. या खेळाडूंना रोखणे इतरांसाठी कठीण जाणार अाहे. पूजा वराडे हजार मीटर धावण्याच्या शर्यतीतील स्टार खेळाडू असून तिने २०१३ मध्ये पंजाब विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत १० मीटर शर्यतीत विक्रम प्रस्थापित केले. भाग्यश्री शिर्केने आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरीसह सर्वांचे लक्ष वेधले होते.