आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inter University Sport Festival At Aurangabad, Latest News In Marathi

अांतरविद्यापीठ क्रीडा महाेत्सव : कबड्डीत यजमानांची ठरणार कसोटी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अांतरविद्यापीठ क्रीडा महाेत्सवाच्या कबड्डी खेळ प्रकारात यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाची बाेनस कामगिरी करण्यावर नजर असेल. यासाठी यजमानांना महोत्सवात कबड्डी खेळात नाशिक, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे संघाच्या मजबूत अाव्हानाला समाेरे जावे लागेल. घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करण्याची यजमान संघाला अाशा अाहेे. गत वेळी नाशिक येथे झालेल्या क्रीडा महोत्सवात मुलांच्या गटात कोल्हापूरने मुंबईला रोखून विजेतेपद पटकावले होते. औरंगाबादच्या विद्यापीठ संघाने कांस्यपदक जिंकले होते. अाता या स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव काेरण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल.
मुंबई, पुण्याचे वर्चस्व
महिलागटात गत वर्षी मुंबईच्या एसएनडीटीने यजमान मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला मात देत प्रथम क्रमांक मिळवला होता. मुंबईचा दुसरा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. मुलींमध्ये पुण्याचा संघ सर्वाधिक बलाढ्य आहे. त्यांना रोखणे कठीण असून गत वर्षी धक्कादायक निकालामुळे त्यांना बाहेर पडावे लागले होते. यंदा मात्र ते पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतील. त्यांना रोखणे आव्हानात्मक राहील. नाशिक, अमरावती, सोलापूरलाही कमी लेखता येणार नाही.
शिवम, प्रणव, बळीरामवर मदार : यजमानसंघाची मदार शिवम जाधव, प्रणव अहिरे अाणि बळीराम पायघन यांच्यावर असेल. शिवम सर्वाेत्कृष्ट चढाईसह अष्टपैलू कामगिरीत तरबेज अाहे. मयूर शिवलणकर अाणि प्रणव अहिरेकडून त्याला चांगली साथ मिळेल. गत कांस्यपदक विजेत्या संघातील सदस्य बळीराम पायघनवर यंदाही मोठी जबाबदारी असेल. संघाची तयारी चांगली झाली असल्याचे प्रशिक्षक डॉ. माणिक राठोड यांनी सांगितले.
किशाेरी,काेमल, साेनीकडून माेठी अाशा :यजमान संघाला राष्ट्रीय खेळाडू काेमल शिंदे, किशाेरी हिवर्डे, साेनी खरात यांच्याकडून साेनेरी कामगिरीची अाशा अाहे. महिला गटात यजमानांना पदक मिळवून देण्याचा या खेळाडूंचा प्रयत्न असेल. याशिवाय ज्याेती लघानेच्या नेतृत्वाखाली संघात साेनाली मुळे, विजया गायकवाड खेळणार अाहेत.
०७ दिवस शिल्लक
३३ संघ सहभागी
१८ पुरुष संघ
१५ महिला संघ