आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: सलमान वडीलांकडून घेतो पॉकेटमनी, विराट स्वयंपाकात आहे सुगरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सलमान खानसंदर्भात वाद लवकर चर्चेत येतात तर चांगल्या बाबी कायम लपून राहतात. त्याच्या चाहत्यांप्रमाणेच सर्वसामान्य युवकांसाठीही त्याचे विचार प्रेरणादायी आहेत. उद्या (27 डिसेंबर) 48 वर्षांचा होणारा सलमान त्याचे उत्पन्न जरी त्याच्या बॅंक खात्यात जमा करीत असला तरी सायनिंग अथॉरिटी त्याचे वडील सलीम खान आहेत.
सलमानचे चित्रपट, जाहिराती आणि शोच्या कमाईची रक्कम याच खात्यात जमा केली जाते. सलमानसाठी प्रॉपर्टी विकत घेण्याचा किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णय त्याचे वडील सलीम खानच घेतात. एवढेच नव्हे तर सलमानला पॉकेटमनीही तेच देतात. सलमानची बीइंग ह्युमन नावाची समाजसेवी संस्था आहे. तिला 9 ते 10 कोटी रुपये देण्याचे कामही तेच करतात. एवढा सलमानचा वडीलांवर विश्वास आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, विराट स्वतः का करतो स्वयंपाक, कोण प्रत्येक तासाला कमवितो 21 लाख रुपये... अशाच काही रंजक बाबी...