आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Record Was Noted When Dhoni Bowled Against South Africa

धोनीने केली गोलंदाजी आणि कसोटी क्रिकेटमध्‍ये नोंदविल्‍या गेली एक रोचक घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्‍सबर्गमध्‍ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्‍या सुरु असलेल्‍या कसोटीत सध्‍या आफ्रिकेचे पारडे जड आहे. हा सामना अतिशय रोमांचक स्थितीत आला असून भारतावर पराभवाची नामुष्‍की ओढावण्‍याची शक्‍यता आहे. भारताची दुस-या डावात कोसळलेली फलंदाजी यामागचे प्रमुख कारण आहे. या रोमांचक सामन्‍यात एक आगळीवेगळी घटनाही नोंदविण्‍यात आली.

चौथ्‍या दिवशी खेळ संपायला आला त्‍यावेळेस भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजी केली. विराट कोहलीने यष्‍टीरक्षण केले. तर तिस-या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा यष्‍टीरक्षक ए. बी. डिव्‍हीलियर्सनेही गोलंदाजी केली होती. एखाद्या कसोटी सामन्‍यात दोन्‍ही संघाच्‍या यष्‍टीरक्षकांनी गोलंदाजी करण्‍याची ही पहिलीच वेळा आहे.

या सामन्‍यातील असेच काही रोमांचक क्षण पाहा छायाचित्रांमधून... क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...