आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Cricket Council Give Permission To Mohit

मोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ग्रीन सिग्नल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दुखापतीमुळे विश्वचषकातून स्पर्धेबाहेर झाल्यानंतर मोहित शर्माच्या संघातील समावेशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे. स्पर्धेच्या तांत्रिक समितीने मोहितच्या संघ समावेशाला हिरवा कंदील दाखवला. विश्वचषकाला येत्या १४ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

अॅडिलेड येथे शनिवारी झालेल्या फिटनेस चाचणीत ईशांत शर्मा अपयशी ठरला. ईशांत गुडघ्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपासून त्रस्त आहे. तो गेले दोन महिने ऑस्ट्रेलियात भारतीय संघासोबत असून, त्याने ऑस्ट्रेलियात दुखापतीवर उपचार देखील घेतले.