आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्‍ट्रीय डेझर्ट स्टॉर्म कार रॅलीला सुरुवात...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अकराव्या मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्म कार रॅलीला सोमवारी सकाळी नवी दिल्लीहून प्रारंभ झाला. स्पर्धेत तब्बल 263 खेळाडूंनी 138 टीमच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. प्रमोद राठोड यांच्यासह औरंगाबादचे 9 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सहा दिवस चालणा-या या स्पर्धेत खेळाडूंना 2200 कि.मी.चा खडतर रस्ता पार करायचा असतो. भारतातील ही सर्वाधिक कठीण आणि आव्हानात्मक मोटार रॅली मानली जाते. ही स्पर्धा 23 फेब्रुवारी रोजी जयपूर येथे संपेल. गतविजेता सुरेश राणाच्या हस्ते आज सकाळी ध्वज फडकावून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

6 वाजता गाठले 350 किमींचे अंतर - सकाळी 10 वाजता डेझर्ट स्टॉर्म रॅलीला सुरुवात झाली.औरंगाबादच्या प्रमोद राठोडसह 9 खेळाडूंनी शानदार प्रारंभ केला. या खेळाडूंनी सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 350 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. त्यांनी हरियाणामार्गे राजस्थानातील सरदार शहरापर्यंत प्रवास पहिल्या दिवशी पूर्ण केला.


रात्रीचा प्रवास थरारक
दोनदिवसीय लीग-1 चा सरदार येथून पुढील 400 किमींचा प्रवास हा अधिकच रोमांचक व थरारक ठरला. सरदार येथून सोमवारी रात्री प्रवासाला प्रारंभ झाला. राजस्थानातील वाळवंटातून या लीगचा मार्ग होता. यामध्ये औरंगाबादच्या खेळाडूंनी मोठी कसरत करून हा मार्ग यशस्वीपणे पार केला.


महिलांचाही सहभाग
डेझर्ट स्ट्रॉर्म रॅलीत मारुती व टाटा संघांकडून महिलांनीदेखील सहभाग घेतला आहे. दिल्ली, बंगळुरू व कोलकाता येथील महिला स्पर्धेत आपले नशीब अजमावत आहेत.