आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International Olympic Committee Wonder Over Wrestlling Getting Support

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुस्‍तीला जगभर मिळत असलेल्या समर्थनाने आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक समितीस आश्‍चर्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुसाने - ऑलिम्पिक 2020 मधून कुस्तीला बाहेर करण्याच्या शिफारशीवर जगभर विरोध होईल याची आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) अपेक्षा नव्हती. जगभर कुस्तीला मिळालेल्या पाठिंब्यामुळे आयओसी चकित झाली आहे. अशा प्रकारे विरोध होत राहिला तर बहुदा कुस्तीच्या निर्णयावर आम्हाला पुनर्विचार करावा लागेल, असे आयओसीने म्हटले आहे.

आयओसीचे अध्यक्ष जॅक रोगे म्हणाले, ‘माझी आंतरराष्‍ट्रीय कुस्ती महाससंघाच्या (फिला) अध्यक्षांसोबत चर्चा झाली आहे. आमची लवकरच भेट होणार आहे. या निराशाजनक निर्णयावर फिलाने जी प्रतिक्रिया दिली ती स्वाभाविक आहे. या खेळाला ऑलिम्पिकमध्ये कायम ठेवण्यासाठी फिला शक्य ते सर्व प्रयत्न आणि संघर्ष करण्यास तयार आहे.’
रोगे म्हणाले, कार्यकारी मंडळाच्या मतदानाचा अर्थ कुस्ती ऑॅलिम्पिकबाहेर झाली आहे असे मुळीच नाही. हा काही अंतिम निर्णय नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो. रियोत पुढच्या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती हा खेळ असेल. मी जगभरातील मल्लांना सांगू इच्छितो की, त्यांनी आपली ऑलिम्पिकची तयारी सुरू ठेवावी. ती बंद करू नये. 2020 ऑलिम्पिकमध्ये हा खेळ कायम राहावा यासाठी प्रयत्न करेल.
या प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत. कोणत्याही निर्णयासोबत या प्रतिक्रिया आल्या असत्या. आम्हाला प्रथ आणि प्रगती यांच्यात योग्य संतुलन कायम ठेवायचे आहे, असे मत आयओसीचे उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार थॉमस बाक यांनी म्हटले.