आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Primer Tennis League News In Marathi, Mahesh Bhupati

आंतरराष्‍ट्रीय प्रीमियर टेनिस लीगमध्ये सर्व काही सुरळीत - महेश भूपती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्‍ट्रीय प्रीमियर टेनिस लीगमध्ये (आयपीटीएल) सर्व काही सुरळीत असून नियोजनानुसारच सारे घडणार असल्याचे प्रख्यात टेनिसपटू महेश भूपती याने म्हटले आहे. कोणत्याही प्रायोजकाने किंवा संघमालकाने माघार घेतली नसून स्पर्धा अगदी ठरल्यानुसारच होणार असल्याचेही भूपतीने नमूद केले आहे.

पीव्हीपी व्हेंचर्सने स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त झळकत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूपतीने स्पेनमधून माध्यमांशी संवाद साधला. मायक्रोमॅक्स हे मुंबई संघाचे मालक आहेत. सचिन तेंडुलकरसह पीव्हीपी गु्रपशी चर्चा सुरू होती. मात्र, निर्धारित काळात ती फलद्रूप झाली नसल्याने ते शक्य झाले नाही. माध्यमांमधील विविध चर्चांमुळे विनाकारण त्रास सहन करावा लागल्याचेही त्याने नमूद केले. भारतीय लिटिल मास्टर सुनील गावसकरदेखील सिंगापूर मास्टर्स या संघाचे सहमालक म्हणून आयपीटीएलमध्ये सहभागी असल्याचे या वेळी भूपतीने म्हटले आहे.

सर्व मालक खेळाडूंना भेटले
मायक्रोमॅक्सकडून राहुल रफायल नदालला भेटला, दुबई संघाचे मालक नोवाक जोकोविचला भेटले तर मनिलाचे मालक अ‍ॅँडी मरेला भेटले. त्यामुळे माध्यमांमधील अफवांना काहीच अर्थ नसल्याचेही भूपती म्हणाला. आमच्या लीगमध्ये खेळणारे खेळाडू अन्य कोणत्याही भारतीय लीगमध्ये खेळणार नसून त्याबाबत करारदेखील झाल्याचेही त्याने नमूद केले.