नवी दिल्ली - बीजिंग अाॅलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा अाणि युवा नेमबाज चैन सिंग यांनी साेमवारी अांतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाचा डबल धमाका उडवला. अभिनवने वैयक्तिकसह सांघिक गटातही साेनेरी यश संपादन करून अागामी जागतिक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.
त्याने १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये सांघिक अाणि वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. तसेच चैन सिंगने ५० मीटर रायफल प्राेन अाणि १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. जर्मन सिटीमध्ये अायाेजित या स्पर्धेत जगभरातील तब्बल १ हजार नेमबाज सहभागी झाले. यामध्ये भारताचे नेमबाज साेनेरी यश संपादन करत अाहेत. त्यापाठाेपाठ
गगन नारंगला पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पाेझीशनमध्ये कांस्यवर समाधान मानावे लागले. यासह भारतीय संघाला साेमवारी स्पर्धेत एकुण सहा पदकाची कमाई करता अाली.
अपूर्वाला कांस्यपदक
महिला गटात भारताचे प्रतिनिधित्व करणा-या अपूर्वा चंदेलाने कांस्यपदक अापल्या नावे केले. तिने महिलांच्या एअर रायफल प्रकारात तिसरे स्थान गाठून पदक जिंकले.