आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, सचिनने पहिले द्विशतक झळकावलेल्‍या मोटेरो स्‍टेडियमविषयी सर्वकाही..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: अहमदाबादचे सरदार पटेल स्टेडियम)
अहमदाबाद (गुजरात) - भारत आणि श्रीलंका दरम्‍यान होत असलेल्‍या एकदिसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना अहमदाबादच्‍या मोटेरा स्टेडियममध्‍ये खेळल्‍या जाणार आहे. 50 एकर परिसर असलेल्‍या या मैदानावरच सचिनने पहिले-वहिले द्विशतक झळकावले आहे.
या दिग्‍गजांनी केले मोटेरोवर विक्रम
मोटेरा स्टेडियमवर सुनील गावस्कर यांनी 10 हजार धावा पूर्ण केल्‍या होत्‍या. तसेच कपिल देव यांनी 432 विकेटचा विश्‍व विक्रम याच मैदानावर तोडला होता. मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने देखील या मैदानावर कसोटीमधील पहिले द्विशतक झळकावले.
स्टेडियमला लोहपुरुष सरदार पटेल यांचे नाव
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव या स्‍टेडियमला देण्‍यात आले आहे. स्टेडियमचे नाव ‘सरदार पटेल स्टेडियम’ ठेवण्‍यात आले. या स्टेडियममध्‍ये 55 हजार प्रेक्षक बसून शकतात. हे मैदान गुजरात क्रिकेट असोसिएशनच्‍या ताब्‍यात आहे. स्टेडियममध्‍ये एकूण 6 स्टँड आहेत. ज्‍यामध्‍ये जीएमडीसी अप्‍पर अँड लोअर स्टँड, ईस्ट अप्‍पर अँड लोअर स्‍टँड, अदाणी लोअर पॅव्‍हेलियन, अदाणी अप्‍पर पॅव्‍हेलियन, क्लब पॅव्‍हेलियन आणि वेस्ट पॅव्‍हेलियन यांचा समावेश होता.

पुढील स्‍लाइडवर वाचा, भारत-श्रीलंकेचा या मैदानावरील इतिहास...