आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराल्युसाने- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी)ने मंगळवारी 2020 च्या ऑलिंपिकमधून कुस्ती हा खेळ वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीऐवजी अन्य खेळाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समितीच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
आयओसीने पेंटाथलॉन हा खेळ कायम ठेवत कुस्तीला वगळण्याचा निर्णय घेतला. कुस्तीपेक्षा पेंटाथलॉन हा खेळ अधिक जोखमीचा समजला जातो, असेही या अधिका-याने सांगितले. अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
उल्लेखनीय म्हणजे भारताला कुस्तीमध्येच पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळाले होते. लंडन ऑलिंपिकमध्येही भारताने कुस्तीत दोन पदके मिळवली होती. ऑलिंपिकमधून कुस्ती वगळल्याचा फटका भारताला बसणार आहे. कारण गेल्या काही वर्षात कुस्तीमध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
आयओसी समितीने सध्या ऑलिंपिकमध्ये खेळवण्यात येत असलेल्या 26 खेळांची समीक्षा केल्यानंतर हा निर्णय घेतला. एका खेळास वगळल्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला या वर्षाअखेरीपर्यंत नव्या खेळाचा समावेश करण्याची संधी मिळेल. गेल्यावर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाईल कुस्तीत 11 आणि ग्रीको रोमनवर सहा सुवर्ण पदके होती.
2020 च्या ऑलिंपिकमध्ये कुस्तीचा समावेश होण्यासाठी अर्ज करावा लागेल. अन्य खेळात बेसबॉल, कराटे, स्क्वॉश, रोलर स्पोर्ट्स क्लाइम्बिंग, वेकबोर्डिंग आणि वुशु खेळांचा समावेश आहे. यापैकी एका खेळास 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये संधी मिळू शकते. यासंबंधीचा निर्णय सप्टेंबर महिन्यात अर्जेंटीना येथील ब्यूनस आयर्समध्ये होणा-या बैठकीत घेण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.