वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या फलंदाजीचे तुफान यावेळीही चाहत्यांना अनुभवायला मिळत आहे. मैदानावर बिनधास्त फलंदाजी करणाऱ्या गेलची लाईफस्टाईलही तेवढीच बिनधास्त आहे. मैदानाबाहेर तो नेहमीच मस्तीच्या मूडमध्ये असतो. गेलला तर पार्टी अॅनिमलही म्हटले जाते.
रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये तो हमखास असतोच. त्याचबरोबर तो तेवढाच रोमँटिकही आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ते लगेचच लक्षात येते. गेलच्या पत्नीचे नाव नताशा बॅरीज आहे. नताशा गेल बरोबर आयपीएलदरम्यान 2012 मध्ये भारतात आली होती. सहा भावंडांमध्ये गेल 5 वा आहे.
असे सुरू झाले करिअर
गेलचे नाव सध्याच्या स्फोटक फलंदाजांच्या यादीत आघाडीवर असले तरी तो सुरुवातीला तसा नव्हता. गेलने जेव्हा क्रिकेट कारकिर्द सुरू केली होती तेव्हा तो फिरकी गोलंदाजी करायचा. त्याची फलंदाजीही अत्यंत सामान्य फलंदाजांप्रमाणे होती. वयाच्या 19 व्या वर्षापासून क्रिकेट खेळणाऱ्या गेलने 1999 मध्ये वनडेमध्ये तर 2000 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
बिनधास्त लाइफस्टाइल
गेलला बिनधास्त लाइफस्टाइल आवडते. रोमान्स, अॅडव्हेंचर, डान्स, म्युझिक, मस्ती हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. जीवनाचा आनंद घेत जगणे त्याला आवडते. जमैकाचा राहणारा असलेल्या गेलला पार्ट्या आणि आऊटींग करायची आवड आहे. कॅरेबियन बेटांवर फिरणे त्याला जास्त आवडते. त्याचे मित्र तर त्याला प्लेबॉय, पार्टी अॅनिमल असे म्हणतात. त्याच्या पार्टीत नेहमीच हॉट आणि ग्लॅमरस महिला असतात. त्याला स्टायलिश, फंकी ड्रेस आणि ब्रँडेड घड्याळींचीही आवड आहे. हॉलीवूडच्या पॉप स्टार्सच्या पोस्टरबरोबर फोटो काढायलाही त्याला आवडते. त्याला गायनाचीही आवड आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गेलचे काही PHOTO'S