आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिस गेलवरील विशेष मेहरबानीमुळे भडकले आरसीबीचे खेळाडू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - रॉयल चॅलेंर्जस बेंगळुरू संघाचे मालक विजय मल्ल्या यांच्यावरील आर्थिक संकटाचा परिणाम संघाच्या खेळाडूंवर होत आहे. आयपीएल-5 मध्ये खेळलेल्या काही खेळाडूंना त्यांच्या ठरलेल्या मानधनातील पहिल्या टप्यातीलही रक्कम मिळालेली नाही. या खेळाडूंमध्ये कर्णधार डेनियल विटोरी याच्यासाहित भारतीय आणि विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
यापूर्वी असे कधीही झाले नव्हते, खेळाडूंना मानधन देण्याच्याबाबतीत आरसीबीला पहिल्यांदाच उशीर झाला आहे. आरसीबी फ्रॅंचायजीने खेळाडूंना याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे खेळाडू चिंताग्रस्त आहेत. संघाचे संचालक सिद्धार्थ मल्ल्या याबाबतीत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.
आरसीबीच्या खराब मॅनेजमेंटचा फटका दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेच्या खेळाडूंना बसला आहे. तरीही वेस्टइंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेल याचे मानधन दिले गेले आहे. आरसीबीच्या एका खेळाडूने या गोष्टीवर आपला राग व्यक्त करीत, गेलला वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते असे म्हटले आहे.
असे समजते की, बांग्लादेश प्रीमियर लीगही अशाच काही कारणांमुळे चर्चेत आली होती. बीपीएल फ्रॅंचायजी विदेशी खेळाडूंच्या मानधनाच्या संदर्भात टाळाटाळ करीत आहे.
विजय मल्‍ल्‍यांचे घर आणि ऑफिसचा होणार लिलाव