आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 6 Chennai Super Kings Vs Delhi Daredevils At Delhi

IPL: चेन्नई सुपर किंग्जचा दिल्लीवर 86 धावांनी दणदणीत विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली- आयपीएल-6 मध्ये मोहित शर्मा (3/10) व आर. अश्विन (2/18) यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने गुरुवारी यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 86 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 4 बाद 169 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ अवघ्या 83 धावांवर गारद झाला. चेन्नईचा मायकेल हसी सामनावीर ठरला.

धावांचा पाठलाग करणा- या दिल्लीकडून वीरेंद्र सेहवाग (17), केदार जाधव (31) व जीवन मेंडिस (12) संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. कर्णधार जयवर्धनेसह दिल्लीचे सात फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले. तत्पूर्वी चेन्नईकडून मायकेल हसी व मुरली विजयने पहिल्या गड्यासाठी 30 धावांची भागीदारी केली. दरम्यान, मुरली विजयला (18) मोर्केलने बाद केले. सुरेश रैनाने हसीसोबत दुस- या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. रैनाने 32 चेंडंूत 5 चौकारांसह 30 धावा काढल्या. महेंद्रसिंग धोनीने (44) हसीसोबत तिस- या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली.

हसीचे दुसरे नाबाद अर्धशतक
चेन्नई सुपरकिंग्जच्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या मायकेल हसीने आयपीएल-6 मध्ये दुसरे नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने दिल्लीविरुद्ध सामन्यात नाबाद 65 धावा काढल्या. यापूर्वीं त्याने मोहालीत 10 एप्र्रिलला पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद 86 धावा काढल्या होत्या.