आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CONTROVERSY: परवेझ रसूलने जर्सीवर छापला नाही मद्याच्या ब्रॅडचा लोगो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जम्मू-कश्मीरमधील पहिला क्रिकेटर परवेझ रसूल हा आयपीएल-6 मध्ये पुणे वॉरियर्स संघात खेळत आहे. परंतु त्याने आपल्या जर्सीवर मद्याच्या ब्रॅंडचा लोगो लावण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संघाच्या जर्सीवर मद्याच्या ब्रॅंडचा लोगो लावल्याने त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही परवेज रसूल याने म्हटले आहे.

कोलकाता संघाविरुद्ध गेल्या आठवड्यात झालेल्या लढतीत 24 वर्षीय रसूल हा पहिल्यांदाच मैदानावर उतरला होता. जर्सीवर मद्याच्या बॅंडचा लोगो उमटू नये म्हणून त्याने आपल्या टेक्सो टेपचा वापर केला होता.

रसूल म्हणाला की, 'जर्सीवर मद्याचा लोगो छापण्यासाठी मी टेपचा वापर केला. असे पाहून लोकांना आश्चर्य वाटले असेल. परंतु माझ्या धर्मात मद्य सेवन करणे अवैध आहे. त्यामुळे मी मद्याच्या ब्रॅंडचा प्रचार करू शकत नाही. माझ्या निर्णयामुळे माझे कुटूंबीय आनंदी आहेत.'