आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये महेलाच्या 1500 धावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार महेला जयवर्धनेने आयपीएलमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो 16 वा फलंदाज ठरला. 1500 धावा पूर्ण केल्या यात रॉबिन उथप्पा, शिखर धवन, कुमार संगकारा, शॉन मार्श, विराट कोहली, राहुल द्रविड, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, महेंद्रसिंग धोनी, क्रिस गेल, वीरेंद्र सेहवाग, जॅक कॅलिस, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, गंभीर आणि रैना यांचा समावेश आहे.

मधल्या फळीचे अपयश भोवले
केकेआरविरुद्ध आमची फलंदाजी चांगली झाली नाही. मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश आम्हाला भोवले. मधल्या फळीत आम्ही अचानक खूप विकेट गमावल्या. याचा फटका आम्हाला बसला, असे महेलाने या वेळी नमूद केले. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर आम्ही स्वत:ला सावरले. मात्र, वॉर्नर बाद झाल्यानंतर आमची लय तुटली. प्रत्येक विकेटनंतर डाव सावरणे सोपे नसते, असेही महेला जयर्वधनेने सामन्यानंतर म्हटले. आमच्या हाती काही विकेट असत्या तर कदाचित सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते. खेळपट्टीसुद्धा थोडा स्लो होती, असेही त्याने नमूद केले.