आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl 6 Hydrabad Sunrisers Won On Royal Challengers Banglore In Super Over

PHOTOS: IPL च्‍या मैदानावर पुन्‍हा एकदा OOPSE...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- आयपीएलने हळूहळू आपले रंग दाखवण्‍यास सुरूवात केल्‍याचे दिसत आहे. रविवारी हैदराबाद सनरायजर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी जबरदस्‍त पर्वणीचा ठरला. समान धावसंख्‍येवर टाय झालेला सामना सुपर ओव्‍हरपर्यंत ताणला गेला. त्‍यामुळे खेळाडूंबरोबर प्रेक्षकांच्‍या ह्दयाचे ठोकेही त्‍यावेळी वाढल्‍याचे दिसले.

बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने कमी धावसंख्‍या असलेला सामना सुपर ओव्‍हरपर्यंत पोहोचवण्‍याची कमाल केली. मात्र, त्‍याचा फायदा टीमला घेता आला नाही. सनरायजर्स हैदराबादने घरच्‍या मैदानावर सलग दुसरा सामना खिशात टाकून आपला दम दाखवून दिला.

बेंगळुरूच्‍या टीमने प्रथम फलंदाजी करताना 130 धावा जमवल्‍या होत्‍या. ख्रिस गेल अवघ्‍या एका धावेवर बाद झाल्‍यानंतर बेंगळुरूच्‍या एकाही फलंदाजाने आक्रमकता दाखवली नाही. कर्णधार कोहली 46 आणि हेन्रीक्‍सच्‍या 44 धावांच्‍या जोरावर त्‍यांना 130 धावांपर्यंत मजल मारता आली.

हेन्रीक्‍सने गोलंदाजीतही कमाल दाखवताना हैदराबादचा पहिला गडी अवघ्‍या 4 धावेवर असतानाचा टिपला. संघाच्‍या 16 धावा होतायत की नाही तोपर्यंत हेन्रीक्‍सने पुन्‍हा दुसरा धक्‍का देत कॅमेरून व्‍हाईटलाही तंबूचा रस्‍ता दाखवला.

अक्षत रेड्डीने 23 आणि हनुमा विहारीने नाबाद 44 धावांची खेळी करून संघाचा स्‍कोअर 130 पर्यंत पोहोचवून बेंगळुरूच्‍या धावांची बरोबरी केली.

विनयकुमारने शेवटचे षटक चांगले टाकल्‍यामुळे हैदराबादला सामना जिंकता आला नाही. विनयकुमारच्‍या गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्‍हर ( One Over Per Side Eliminator- OOPSE) पर्यंत पोहोचला.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या IPL- 6 चा पहिला OOPSE...