आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूचा रॉयल विजय; रोमांचक सामन्यात मुंबईवर 2 धावांनी केली मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - आयपीएल-6 च्या दुसर्‍या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर संघावर 2 धावांनी निसटता विजय मिळवला. यासह बंगळुरूने स्पर्धेत विजयी सुरुवात केली. बंगळुरूच्या विजयात गेल (92 धावा) आणि वेगवान गोलंदाज विनयकुमार (3 विकेट) यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.
बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 156 धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 5 बाद 154 धावाच काढता आल्या. मुंबईची सुरुवात चांगली झाली. सचिन तेंडुलकर आणि कर्णधार रिकी पाँटिंग यांनी 52 धावांची सलामी दिली. यानंतरही मुंबईचा पराभव झाला. सचिन (19 चेंडूंत 4 चौकारांसह 23), पाँटिंग (33 चेंडूंत 1 षटकार, एक चौकारासह 28 धावा), रोहित शर्मा (11), अंबाती रायडू (18) यांना मोठी खेळी करता आली नाही.