आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl 6 Live Match With Pune Warriors Vs Kings Eleven Punjab

IPL: किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबची विजयी सुरूवात, 8 गडी राखून पुण्‍याचा केला पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे संघाने दिलेले 100 धावांचे आव्‍हान किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबने 46 चेंडू आणि 8 गडी राखून पूर्ण केले. मनन व्‍होराने आक्रमक फलंदाजी करत पंजाबला सहज विजय मिळवून दिला. व्‍होराने 28 चेंडूत नाबाद 43 धावा केल्‍या. त्‍याला मनदीप सिंगने योग्‍य साथ दिली. मनदीपने 26 चेंडूत 31 धावा केल्‍या. पंजाबकडून गिलख्रिस्‍टने 15 धावा केल्‍या. बाद होण्‍यापूर्वी गिलख्रिस्‍टने आक्रमक सुरूवात केली होती. भुवनेश्‍वर कुमारच्‍या पहिल्‍याच षटकात त्‍याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावले. मात्र, पुढच्‍याच षटकांत कर्णधार अँजेलो मॅथ्‍यूजने त्‍याला बाद केले. डीप स्‍वेक्‍अरलेगला उभ्‍या असलेल्‍या सॅम्‍युल्‍सने त्‍याचा झेल टिपला. डेव्हिड हसी 8 धावांवर नाबाद राहिला. पुण्‍याकडून अँजेलो मॅथ्‍यूज आणि राहूल शर्माने 1-1 गडी टिपला.

पुणे संघाच्‍या डावाविषयी जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...