आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl 6 Match Of Sunrisers Hydrabad Vs Kings Xi Punjab

IPL: सनरायझर्सला चॅलेंज किंग्जचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- आयपीएल-6 मध्ये सरप्राइज पॅकेज सनरायझर्स हैदराबादचा पुढचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी शुक्रवारी होईल. पुणे वॉरियर्सविरुद्ध रोमांचक विजयानंतर आणि अमित मिश्राच्या हॅट्ट्रिकमुळे सनरायझर्सचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. दुसरीकडे किंग्ज इलेव्हनने दोन वेळेसची चॅम्पियन टीम चेन्नई सुपरकिंग्जला हरवले असले तरीही त्यांचे एकूण प्रदर्शन संमिश्रच राहिले आहे.

सनरायझर्सची मजबूत बाजू
गोलंदाजीत डेल स्टेन, ईशांत शर्मा आणि अमित मिश्रा चांगल्या फॉर्मात आहेत. डेल स्टेनने आतापर्यंत (6 सामन्यांत 7 विकेट), ईशांत शर्मा (6 सामन्यांत 7 विकेट) आणि अमित मिश्रा (6 सामन्यांत 9 विकेट) स्पर्धेत दमदार प्रदर्शन केले आहे. अमितने पुणे वॉरियर्सविरुद्ध एकाच षटकात चार विकेट घेऊन कमाल कामगिरी केली होती. तिसरा परेरासुद्धा ऑलराउंड कामगिरी करीत आहे.

दुबळी बाजू
फलंदाजीत संघाकडून अद्याप एकही मोठा स्कोअर झालेला नाही. त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. कॅमरुन व्हाइट, पार्थिव पटेल, तिसरा परेरा, विहारी आणि कुमार संगकारा यांचे प्रदर्शन सामान्य राहिले आहे. सलगच्या सुमार कामगिरीमुळे कुमार संगकाराने स्वत:ला पुण्याविरुद्धच्या लढतीतून संघाबाहेर केले होते.

किंग्ज इलेव्हनची सकारात्मक बाजू
किंग्ज इलेव्हनकडून गोलंदाजीत प्रवीणकुमार, अझहर मेहमूद, पीयूष चावला आणि मनप्रीत गोनी तसेच परविंदर अवाना यांच्यावर मदार आहे. हे खेळाडू कोणत्याही सामन्याचे चित्र बदलू शकतात. फलंदाजीत फक्त डेव्हिड हसी चांगली कामगिरी करीत आहे. युवा ऑलराउंडर मनप्रीत गोनी चांगल्या फॉर्मात आहे. संघाचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी चांगली होत आहे. हेच या टीमचे शक्तिस्थान यापुढेही ठरू शकते.

दुबळी बाजू
युवा खेळाडू मनदीपसिंग, मनन वोहरा आणि कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि अझहर मेहमूद यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे.

सनरायझर्सचा फिरकीपटू अमित मिश्राने पुण्याविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. अमितच्या गुगली गोलंदाजीला खेळण्याचे आव्हान किंग्जसमोर असेल.