आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल-6 : मुंबई इंडियन्सच्या सरावाला प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल टीम मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सरावास प्रारंभ केला. टीमचा नवा कर्णधार रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी आयपीएल-6 च्या तयारीला सुरुवात केली. येत्या तीन एप्रिलपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार आहे.

जगातील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या पाँटिंगच्या नेतृत्वाखाली मुंबई टीम अधिक मजबूत दिसत आहे. पूर्ण टीमने शुक्रवारी नेटवर कसून सराव केला. मात्र, या वेळी कर्णधार पाँटिंग स्वत: सरावात सहभागी झाला नव्हता.

प्रज्ञान ओझा, दिनेश कार्तिक, धवल कुलकर्णी, सुशांत मराठे, सूर्यकुमार यादवसह संघातील 12 खेळाडू सरावादरम्यान उपस्थित होते. येत्या चार एप्रिलला मुंबईचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर मुंबई टीम घरच्या मैदानावर 9 एप्रिलला दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाचा सामना करेल.

38 वर्षीय पाँटिंगने गत डिसेंबरमध्ये आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सरावादरम्यान, त्याने मेंटर अनिल कुंबळे, मुख्य कोच जॉन राइट यांच्यासोबत चर्चा केली.