आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl 6 Pune Warriors Vs Hydrabad Sun Risers Match Live

हैदराबादने पुण्‍याला दिले 127 धावांचे आव्‍हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- पुणे वॉरियर्सच्‍या अचूक गोलंदाजीसमोर आयपीएलच्‍या सहाव्‍या सत्रात पहिल्‍यांदाच खेळणा-या हैदराबाद सनरायजर्सला प्रभाव पाडता आला नाही. अशोक दिंडा, भुवनेश्‍वर कुमार, युवराज सिंग आणि राहुल शर्मा यांनी फलंदाजांना जखडून ठेवले. हैदराबाद संघाने 20 षटकात 6 बाद 126 धावा केल्‍या. यामध्‍ये थिसारा परेराने सर्वाधिक 30 धावा केल्‍या. त्‍याच्‍या फटकेबाजीमुळे हैदराबादला 100 धावांचा टप्‍पा पार करता आला. अक्षत रेड्डी 27, पार्थिव पटेल 19 आणि कर्णधार संगकाराने 15 धावा केल्‍या. पुण्‍याकडून दिंडा 2, सॅम्‍युल्‍स, भुवनेश्‍वर कुमार, शर्मा, आणि युवीने 1-1 विकेट घेतल्‍या.

तत्‍पूर्वी, सॅम्‍यूल्‍स समोर हैदराबादची फलंदाजी पूर्णपणे निष्‍प्रभ ठरली. भुवनेश्‍वर कुमारने आपली पहिली विकेट घेताना विहारीला 11 धावेवर बाद केले. दिंडाने त्‍याचा जबरदस्‍त झेल टिपला. फटकेबाजी करणा-या परेराला दिंडाने बाद केले. त्‍याचा ओवर मिडविकेटवर उडालेला झेल पांडेने टिपला. परेराने 17 चेंडूत 30 धावा केल्‍या. त्‍याच्‍या या फटकेबाजीमुळे हैदराबादला 100 धावांचा टप्‍पा पार करता आला. तत्‍पूर्वी, सॅम्‍यूल्‍सचे 17 वे षटक पुण्‍यासाठी महागडे ठरले. परेराने त्‍याच्‍या षटकात एक षटकार आणि चौकारासह 15 धावा काढल्‍या.

कॅमेरून व्‍हाईटलाही फलंदाजीत काही चमक दाखवता आली नाही. मर्लन सॅम्‍युल्‍सचा चेंडू त्‍याने जोराने डीप मिडविकेटच्‍या दिशेने मारला. पण अगदी सीमारेषेनजीक मार्शने त्‍याचा झेल टिपला. व्‍हाईटने अवघ्‍या 10 धावा केल्‍या. रेड्डी बाद झाल्‍यानंतर फलंदाजीस आलेल्‍या थिसारा परेराने सलग दोन चौकार मारून आपला आक्रमक इरादा दाखवला. युवराज सिंगने सलामीवीर अक्षत रेड्डीचा त्रिफळा उडवला. रेड्डीने 27 धावा केल्‍या पण त्‍यासाठी त्‍याने 30 चेंडू खर्च केले.