आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 6 Spot Fixing Issue, BCCI Ex President S Bindra Comment

\'त्या\' रात्री क्रिकेटपटूसोबत थांबणारी ‘ती’ कोण? बिंद्रा यांचा गौप्यस्फोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांनी आपल्या वेबसाइटवर भारतीय क्रिकेटपटू, कॉलगर्ल आणि सट्टेबाजांच्या बाबतीत खळबळ उडून दिली आहे. 2010 मध्ये र्शीलंका दौर्‍यावर गेलेल्या टीम इंडियाच्या एका क्रिकेटपटूसोबत रात्रभर खोलीत एक मुलगी होती. आयसीसीच्या काळ्या यादीत नाव असलेल्या सट्टेबाजाने या मुलीला पाठवले होते. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात या मुलीचे छायाचित्र स्पष्ट दिसते, असे लिहिले आहे.

बिंद्रांच्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यास चेन्नई सुपरकिंग्जमध्ये मागील सहा वर्षांत सहभागी खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, मुरली विजय, अभिमन्यू मिथुन त्या वेळी भारतीय संघात होते.

बिंद्रा म्हणाले की, र्शीलंका क्रिकेट मंडळाने या पूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार केला होता. संघ व्यवस्थापकांची साक्षही नोंदवली होती. आयसीसी भ्रष्टाचारविरोधी पथकालाही याची माहिती दिली होती. मात्र, बीसीसीआयच्या दबावामुळे हे प्रकरण समोर आले नाही, असाही आरोप बिंद्रा यांनी केला. या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा सट्टेबाज व क्रिकेटपटूंचे संबंध चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयच्या कार्यकारिणीमध्ये राजीनामासत्राने खळबळ उडवून दिली आहे. बिंद्रा यांचा गौप्यस्फोट आता विशेष चर्चेचा ठरेल.