आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयची विचारमंथन बैठक निष्फळ; लाखोंचा चुराडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील विचारमंथनातून काहीच निष्पन्न झाले नाही. लाखो रुपयांचा चुराडा झाला. ‘मी दोषी नाही.’ संशयाची सुईदेखील माझ्या दिशेने रोखलेली नाही. त्यामुळे मी राजीनामा देणार नाही. या एन. श्रीनिवासन यांच्या गर्जनेमुळे गर्भगळीत झालेल्या कार्यकारी समिती सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणीच केली नाही.

अरुण जेटली, राजीव शुक्ला, अनुराग ठाकूर, बंसल ही सारी मंडळी दिल्लीत बसून टेलिकॉन्फरन्सींगद्वारा श्रीनिवासन यांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरली. अनील कुंबळेलाही क्रिकेटचा आवाज उठविता आला नाही. श्रीनिवासन यांनी स्वत:चे जराही नुकसान करून न घेता सर्वांच्या डोळ्यात उत्तम प्रकारे धूळ फेक केली. आयसीसीवरील प्रतिनिधीत्व कायम करण्याची त्यांची महत्वाकांक्षा यशस्वी ठरली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रवी सावंत यांनी या बैठकीतील निर्णयाविषयची वैधतेविषयी सवाल उपस्थित केला होता. त्याच्या मुद्यावर आय. एस. बिंद्रा न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जगमोहन दालमिया यांच्यावर अध्यक्षांचे कामकाज पाहण्याची टाकण्यात आलेली जबाबदारी हा निर्णय अडचणीत येऊ शकतो. दालमिया यांनी बैठकीत क्रिकेटमध्ये सध्या चालले आहे त्याबाबत काळजी व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून त्यांनी बैठकीतच सूचना व उपाय सुचविले. सर्वप्रथम त्यांनी अयपीएल एक वर्ष बंद करा. सारे काही व्यवस्थित करा,असेही सांगितले.