आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिक्सिंगमध्ये दाऊदच, श्रीसंतला ‘मोक्का’ तर विंदू, मयप्पनला सशर्त जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणी पोलिसांनी आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व छोटा शकील यांनाही आरोपी केले आहे. या दोघांसह श्रीसंत, अंकित चव्हाण व अजित चंदिला अशा 26 आरोपींविरुद्ध ‘मोक्का’नुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला. हा महाराष्ट्र राज्य सरकारचा कायदा दिल्लीतही लागू आहे.

श्रीसंत-चंदिलासह 16 आरोपींचा जामीन मोक्का कोर्टाने मंगळवारी फेटाळला. या सर्वांची 18 जूनपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली. अंकित चव्हाणला विवाहासाठी 6 जूनपर्यंत जामीन मंजूर आहे तर श्रीसंतचा मित्र अभिषेक शुक्लाही जामिनावर सुटला आहे. या कायद्यान्वये आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना आता 90 दिवसांऐवजी 180 दिवसांचा कालावधी मिळेल. यात 5 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

मोक्का लावण्याची कारणे
> फिक्सिंगमधील आरोपी संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपातच कार्यरत होते, असा पोलिसांचा दावा.
> सट्टेबाज, खेळाडू व संघ व्यवस्थापन सहभागी. ते दाऊदसाठी काम करत होते. दुबई, कराची व पाकमधील अन्य शहरांतही नेटवर्क.
> अंडरवर्ल्डचे गुंड खेळाडूंना धमकावत
होते. यात सहभागी असलेल्यांना मोठ्या रकमा पोहचत होत्या.

विंदू, मयप्पनला सशर्त जामीन
मुंबई- फिक्सिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला अभिनेता विंदू दारासिंग व बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पनला 25 हजारांचा जातमुचलका व देश न सोडण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. विंदू व गुरुनाथला दिवसाआड मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागेल.
विंदूला 21 मे तर मयप्पनला 24 मे रोजी अटक झाली होती. दरम्यान, रमेश व्यास , अशोक व्यास, पांडुरंग कदम,नीरज शहा, अल्पेश पटेल आणि प्रेम तनेजा या बुकींनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.