आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स आज समोरासमोर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - इंडियन प्रीमियर लीगमध्ये विजेतेपदाचे दोन प्रबळ दावेदार संघ मुंबई इंडियन आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुरुवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर समोरासमोर असतील. मागच्या स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी साधारण झाली होती. दोन्ही संघांनी मागच्या पाच सत्रांत एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 5 विजय मिळवले आहेत.
दोन्ही संघ जबरदस्त शक्तिशाली आहेत. बंगळुरूकडे क्रिस गेलसारखा स्फोटक फलंदाज आहे. मागच्या दोन सत्रांत गेल सर्वश्रेष्ठ फलंदाज ठरला आहे. तो आतासुद्धा फॉर्मात आहे. गेलच्या तोडीचा फलंदाज मुंबईकडे नाही तरीही मुंबई इंडियन्सची फलंदाजी मजबूत आहे.
मुंबईची टीमही आहे मजबूत
मुंबईकडे सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, रोहित शर्मा, अंबाती रायडूसारखे खेळाडू मोठी खेळी करण्यास सक्षम आहेत. पोलार्ड, मॅक्सवेल आणि रोहित शर्मा अष्टपैलू कामगिरी करून विजयात मोलाची कामगिरी बजावू शकतात. गोलंदाजीत मुंबईकडे मलिंगा, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल आणि हरभजनसिंग यांच्यावर मदार आहे. मलिंगाच्या नावे आयपीएलमध्ये तब्बल 83 विकेट आहेत.
हे आहेत बंगळुरूचे रॉयल खेळाडू
क्रिस गेलने आतापर्यंत 1341 धावा काढल्या आहेत. त्याच्या नावे 129 षटकारसुद्धा सामील आहेत. विराट कोहली, दिलशान, डिव्हिलर्ससारखे फलंदाज संघाचे शक्तिस्थान आहेत. सौरव तिवारी, आणि क्रिस्टियन यांच्यावर विश्वास असेल.