आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल-7 : अंकित, विजयला 30 लाखांचे किमान मानधन

8 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
अंकित बावणे            विजय झोल - Divya Marathi
अंकित बावणे विजय झोल
मुंबई - यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणा-या विविध संघांतील खेळाडूंच्या निवडीसाठीचा लिलाव बंगळुरू येथे 12 व 13 फेब्रुवारीला होणार आहे. या लिलावात औरंगाबादचा अंकित बावणे आणि जालन्याचा विजय झोलला 30 लाखांची पायाभूत किंमत निश्चित करण्यात आली. याशिवाय जॅक कॅलिस, वीरेंद्र सेहवाग, केविन पीटरसन, युवराजसिंग यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या, तर न्यूझीलंडचा नवा तुफानी फलंदाज कोरी अँडरसन, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटॉन डी कॉक आदींच्या नावांची बोली लागेल. नियाल व केविन ओब्रायन (दोघेही आयर्लंड), तर रायन टेन डोस्कॅट (हॉलंड) या सहसदस्य देशांचेदेखील तीन खेळाडू लिलावात असतील.
आयपीएल लिलावासाठी एकूण 514 खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत. त्यापैकी 219 खेळाडूंनी आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व केले आहे, तर 292 खेळाडू अद्यापि देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या 219 खेळाडूंपैकी 169 खेळाडू भारतीय आहेत, तर अवघे 50 खेळाडूच अन्य देशांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. 292 खेळाडूंमध्येही 255 भारतीय, तर अवघे 37 खेळाडू परदेशी आहेत.
ऑस्‍ट्रेलियाच्या मायकल कॅलिंगरसाठी सर्वाधिक 1 कोटी रुपयांची पायाभूत किंमत निश्चित झाली.अष्टपैलू खेळाडूंसाठीच अधिक पायाभूत किंमत (2 कोटी) ठरवण्यात आली आहे. गोलंदाजांना दीड कोटी, तर फलंदाजांना 1 ते दीड कोटींची पायाभूत किंमत मिळाली आहे. भारताचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राला 2 कोटींची पायाभूत किंमत मिळाली आहे, तर जहीरसाठी अवघी 1 कोटी पायाभूत किंमत ठरवण्यात आली आहे. जयवर्धनेला 2 कोटी, तर मिशेल जॉन्सन, कॅलिस, युवराजसिंग, डॅरेन सॅमी, तिलकरत्ने दिलशान, अँजेलो मॅथ्यूज, युसूफ पठाण यांना दोन कोटींची पायाभूत किंमत मिळाली आहे.
श्रीकांत मुंडेला संधी
रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणा-या महाराष्ट्राच्या समद फल्लाह, श्रीकांत मुंडे, हर्षद खडीवाले यांच्यापासून केदार जाधव, अंकित बावणे, विजय झोल यांचाही आयपीएल लिलावाच्या यादीत यंदा समावेश करण्यात आला आहे. यापैकी विजय झोल, अंकित बावणे व केदार जाधव या महाराष्ट्राच्या प्रमुख खेळाडूंसाठी प्रत्येकी 30 लाख रुपये ही बोलीसाठीही पायाभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे.