इंडियन प्रीमियर लीगचा युनायटेड अरब अमिराती (यूएई)मधील प्रवास 30 एप्रिलला पहिले पर्व संपुष्टात आला. दुस-या पर्वातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघादरम्यान आज (2मे) रांची मध्ये खेळल्या जाणार आहे. घरच्या मैदानावर भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करु शकतील.
हेन्रीला मिळू शकते संधी
कोलकाता नाइटरायडर्सला पराभूत करण्यासाठी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हेन्रीचा वापर करु शकतो. वेगवान गोलंदाजांमध्ये धोनी न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला संधी देवू शकतो. हेन्रीने भारताविरुध्द 31 जानेवारी रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये आगमन केले होते. त्यावेळी 38 धावा खर्च करत त्याने चार फलंदाजांना तंबूत पाठविले होते.
सध्या तरी चेन्नईसाठी मोहित शर्मा आणि बेन हिल्पेनहास प्रमुख गोलंदाज म्हणून भूमिका निभावत आहेत. तरीही धोनी हेन्रीचा वापर करु शकतो. चेन्नई संघ रांचीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी जोरदार सराव करत
धोनीच्या घरी रात्री उशिरापर्यंत पार्टी केली.पुढील स्लाइडवर वाचा, कोणत्या खेळाडूंना मिळू शकते अंतिम 11 स्थान